Thursday, June 14, 2007

येरे घना, येरे घना

येरे घना, येरे घना
न्हावूं घाम माझ्या मना


या ओळी आठवण्याचे कारण म्हणजे सध्या बहरत असलेला वर्षा ऋतु. पाऊस आला की "येरे येरे पावसा" हे लहानपणी गायलेले गाणॆ आठवते. लहानपणीचे पावसात भिजणे, गोलगोल गिरक्या घेत पाऊस अंगावर घेणे, गारा वेचुन खाणे, भन्नाट वारा वाहत असताना वा~यासोबत पळायचा प्रयत्न करणे, पावसाचे पाणी एकमेकांच्या अंगावर उडवणे, साचलेल्या पाण्यातून वेगाने सायकल नेवून हे तुषार अंगावर घेणे, चिखलामध्ये खेळणे हे सर्व लहानपणाच्या पावसाच्या आठवणीची विविध रूपे आहेत.
तारुण्यात या पावसाचे संदर्भ बरेच बदलतात. तारुण्यात पाऊस येतोच तो मुळी प्रेमाची साद घालत. तरूण मुला मुलींना हातात हात घेऊन पावसात भिजण्य़ाचे स्वप्न दाखवत येणा~या या पावसात खडकवासला, सिंहगड किंवा लोणावळ्याला जाऊन मनसोक्त भिजणे व त्यानंतर गरम गरम चहा किंवा मक्याचा आस्वाद घेणे यासारखे दुसरे सुख नाही.
भटकंती च्या चाहत्यांसाठी हा काळ खुपच महत्वाचा असतो. बरेच दिवस कोप~यात पडुन असणारे ट्रेकिंग किट आता खुनावू लागते आणि राजगड, तिकोना, कोथळीगड, कोरीगड, हरीश्चंद्रगड ही नावे अचानक आठवू लागतात. मग काय, सुरू होते या गडावरून त्या गडावर प्रवास.
या ऋतुत प्रत्येकाच्या मनातील चित्रकार, कवी, गीतकार, ट्रेकर, प्रेमी जागा होतो. पण सर्वात प्रकर्षाने जाणवतो तो म्हणजे प्रत्येकाच्य़ा आत लपलेले छोटे मुल. या पावसाळ्य़ात आपल्या सर्वांमध्ये लपलेल्या या छोट्या मुलास मनसोक्त खेळू द्या ही आपणा सर्वांस विनंती..

आपणा सर्वांस वर्षा ऋतुच्या हार्दिक शुभेच्छा..

Wednesday, June 13, 2007

People for Animals, Pune

People for Animals, Pune या संस्थेने मागील एक वर्षात शेकडो प्राण्यांचे आयुष्य बदलले आहे. केवळ २ लोक आणि ३ सहाय्यक यांनी मिळून मागील वर्षात ३० पेक्षा जास्त Animal Rescue operations घडवून आणल्या आहेत. त्यांनी ५ मोठ्या धाडीदेखील घडवून आणल्या आहेत ज्यामार्गे शेकडो प्राण्य़ांची सुटका करण्यात त्यांनी यश मिळवले आहे. संस्थेच्या सदस्यांनी भारतात तसेच UK व USA मध्ये विविध ठिकाणी शाकाहार आणि Animal Welfare in India या विषयांवर व्याख्याने दिलेली आहेत.

तुम्ही कशा प्रकारे मदत करू शकता:

१) PFA ला Animal Ambulance आणि Animal Resuce Center साठी जागेची तातडिने गरज आहे.
२) तुम्ही Volunteer म्हणून भाग घेवून प्राण्यांना होणा~या त्रासापासून मुक्तता करण्यात मदत करू शकता.
३) विविध व्याख्याने, चर्चासत्रे, बैठका इत्यादि ठिकाणी PFA च्या सदस्यांना बोलण्यासाठी आमंत्रण देऊन प्रसार करण्य़ात मदत करू शकता.
४) आपल्या जवळपास प्राण्य़ांना होत असलेल्या त्रासाबद्दल PFA ला माहिती पुरवू शकता. (तुमचे नाव गुप्त ठेवण्य़ात येईल).

संपर्क:

People For Animals, Pune
पहिला मजला, केसरिया अपार्टमेंट,
१४९, भवानी पेठ,
पुणे - ४११०४२

फोन: ०२०-६६०१७७९७
ई-मेल: web@pfapune.com
ahinsa.w@dhirajjain.com
ahinsa.w@manojoswal.com

Animal Helpline Pune - 9890793853 / 9890044455

Thursday, June 07, 2007

बचाव सर्प्दंशापासून

सह्याद्रीच्या दर्यखोर्य़ांमध्ये भटकताना सर्वात जास्त भिती असते ती सापांची.. या सापांकडून बचावासा्ठी काही खबरदारीचे नियम मी इथे देत आहे..

१) ज्या ठिकाणी वाढलेले गवत आहे अशा ठिकाणी शक्यतो पायवाट सोडून जाऊ नये. अगदीच गरज भासल्यास आपल्या मार्गात साप नाही याची खात्री करूनच गवतात शिरावे.
२) गवतातून चालताना पायात बूट घालूनच वावरावे. उंच गवतात जायचे असल्यास नेडगी व पोटरी यांच्या संरक्षणार्थ "शिनगार्ड" चा वापर करावा.
३) जंगलात किंवा दाट झाडीतून चालताना डोक्यावर टोपी घालून चालावे. यामुळे झाडांवर असणा~या सापांपासून संरक्षण मिळते.
४) सरपण गोळा करताना लाकडाखाली किंवा सालीखाली लपलेला साप चावण्याची भिती असते. अशावेळी विशेष काळजी घ्यावी. (विशेषत: पावसाळ्यात).
५) उन्हाळ्यात साप गारव्याच्या शोधात असतात. अशा वेळी ते ओलसर जागेकडे आकर्षित होतात. पाणी वापरण्याची जागा तंबूपासून दूर ठेवावे. या जागांभोवती उजेड ठेवावा. अंधारात अशा ठिकाणी अंधारात जावे लागल्यास टॉर्च घेऊनच जावे.
६) तंबूत वस्तू ठेवताना खाली ठेवण्याऐवजी उंचीवर लटकवून ठेवावे. खाली ठेवलेल्या हॅवरसॅक व बूटांमध्ये साप व विंचू लपून बसू शकतात.
७) जेवण झाल्यावर शिल्लक अन्न बरेचदा टाकून देण्यात येते. या अन्नाजवळ उंदरे येतात. या उंदरांच्या वासामुळे साप देखील आकर्षित होतात. यामुळे खरकटे अन्न शक्यतो तंबूपासून लांब अंतरावर टाकावे.
८) डोंगर कपारी व कडे चढताना बरेचदा दगडांमधील सांदीमध्ये बोटे रूतवून आधार घेतला जातो. अशावेळी आत काही नसल्याची खात्री करून मगच बोटे घालावीत.
९) रस्त्यात पडलेले ओंडके व खडक ओलांडून पलिकडे जाताना पलिकडे साप नसल्याची खात्री करून मगच पाऊल टाकावे. बरेचदा या दगड किंवा ओंडक्याखाली गारव्यासाठी व सावलीसाठी बसलेल्या सापावर पाऊल पडल्यास चवताळून तो चावण्याची शक्यता असते.
१०) निसर्गामध्ये आपल्या मार्गात साप आहे व त्याला आपली जाणीव झाली असे जाणवल्यास हालचाल न करता स्तब्ध उभे रहावे. सापाला हालचालीची भिती वाटते व साप केवळ भितीपोटीच हल्ला करतो. हालचाल न केल्यास थोडा वेळ अंदाज घेऊन साप निघून जाईल.

Wednesday, June 06, 2007

नविन टेम्पलेट

तुमच्या लक्षात आले असेलच की मझ्या ब्लॉगचे template बदललेले आहे. (नविन लोकांना कदाचित ह फरक जाणवनार नाही). एका मित्राने शिफारस केल्यावर The Blogger WorkShop या ठिकाणाहून मी हे template घेतले. ३ रखाने असल्यामुळे माझे दुवे आणि इतर गोष्टी मांडणे जास्त सोपे झाले आहे. आणि Background image नसल्यामुळे हे template लवकर load होऊ शकते. त्याचप्रमाणे अतिरीक्त जागेमुळे माझे posts जास्त उत्तम प्रकारे दिसून येतात. एकंदरीत मी तुम्हाला नक्कीच हे template वापरायला सुचवेन. वापरून पहा जरूर..

जाहिरातींना थोडा आळा

संगिता यांनी पावसावर निबंध या लेखाला दिलेल्या अभिप्रायानुसार मी माझ्या ब्लॉगवरील जाहिरातींना थोडासा आळा घातला आहे. माझ्या लक्षात आले की पैसे कमावणाच्या निखळ आनंदामध्ये मी वाचकाचा निखळ आनंद काही प्रमाणात हिरावून घेत आहे. चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या जाहिरातींमुळे वाचकास काही प्रमाणात अडचण होत होती. ही अडचण दुर करन्यामध्ये या नविन template मुळे मला मदत झाली आहे.
नविन रचनेमध्ये जर तुम्हाला काही अडचण जानवत असेल तर मला नक्की सांगा..
धन्यवाद..

Monday, June 04, 2007

अफलातुन पुणे...अफलातुन वाक्ये

1) क्रुपया खिडकीतुन पत्र टाकु नयेत. आमटीत पड्तात. चव बिघडते.
2) धूळ साचलेल्या गाडीच्या काचेवर :- आता तरी पुसा.....
3) ख़ोदुन ठेवलेल्या रस्त्यावर: भव्य पुणे मोटोक्रॉस स्पर्धा :-: सौजन्य पुणे महानगरपलिका
4) लाकडी जीन्यावर : चढण्यासाठी वापर करावा... वाजवण्यासाठी नव्हे.
5) होटेल मधे : कामाशीवाय बसु नये..
6) दुपारी १ ते ४ दार वाजवु नये. येथे माणसे रहातात व ती दुपारी झोपतत.. अपमान कसा होतो ते पहायचे असल्यास वाजवुन पहा....
7) कोर्या कागदाची झेरोक्स काधुन मिळेल.
8) येथे जोशी रहात नाहीत. चौकशी करु नये, अपमान होईल...
9) येथे कचरा टाकू नये साभार परत केला जाईल.

Sunday, June 03, 2007

हे जग स्त्रियांचे

हे जग स्त्रियांचे आहे..
जेव्हा मुलाचा जन्म होतो तेव्हा सर्वजण विचारतात, "आईची तब्येत कशी आहे?"
जेव्हा त्याचे लग्न होते तेव्हा सर्वजण नविन नवरीचे कौतुक करण्यात मग्न असतात.
आणि तो मेल्यावर विचारतात, "बायकोसाठी किती पैसे मागे सोडून गेला?"

Saturday, June 02, 2007

पावसावर निबंध

तसे तर पावसाबद्दल प्रत्येकाची वेगळी मते व वेगळ्या आठवणी आहेत. पण या मुलाला काहीतरी विशेष सांगायचे आहे.त्याने लिहीलेला हा निबंध एकदा वाचून तर पहा.

Friday, May 25, 2007

प्रेम करायचं राहुन गेलं

पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे
आयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला, नाही म्हणाली तर
कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!... पण ते
कधी कळालचं नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
हल्ली पवईलेकवरच्या प्रेमीयुगुलांना पहातोना.. जीव खुप जळतो रे.. शपथ...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
नंतर विचार करतो अजुन लग्नाला दोन वर्षे आहेतं खुप वेळ आहे! अजुन वेळ
गेलेली नाही मित्रा.. काही तरी कर
पण काय करु कुणी मला प्रपोजच करत नाही

Tuesday, May 15, 2007

आशा

जेव्हा जेव्हा तुझ्या भेटीची आशा मी ठेवली,
तेव्हा तेव्हा पायात माझ्या, बेडी मी पाहिली..
खळकन ओघळले अश्रू गालावरी,
प्रत्येक अश्रूत तुझी प्रतिमा मी पाहिली..

अश्रूंस त्या अलगद मी उचलले,
प्रतिमेस त्या ओठांनी स्पर्शिले..
क्षणांत चेह-यावर हास्य विखुरले,
जरी मनात वेदनेचे बांध होते फुटले..

अशीच होणार का गं आपली भेट,
किना-यांची नजरानजर जशी होते थेट..
प्रेमाला या, नजर का लागावी जगाची,
पण,प्रेमिकांनीही हार कधी ना मानली..

तोडायला बेडी आता, ये तू अश्वावरी,
मी मेहंदीने, कडी बघ एक तोडली..
मंगल या सूत्रांत गुंफूनी प्रीत आपुली,
चालूया अग्निसाक्षीने मंदिरात सप्तपदी..

Tuesday, May 08, 2007

जाणीव

Saturday, May 05, 2007

महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक तापमान

राज्यातील उकाडा दिवसेंदिवस वाढत असून, आजही भुसावळला ४७, जळगावला ४६ अंश सेल्सिअस तापमान होते. हे राज्यातीलच नव्हे, तर देशातील सर्वाधिक तापमान आहे. ....
नाशिकला आज ४१.५ अंश सेल्सिअस तापमान झाल्याने उन्हाचे चटके आणखी वाढले. नागपूरलाही पारा ४२.५ वर गेला. राज्यातील विविध शहरांत आजही उच्चांकी तापमानाची नोंद झाली. उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक त्रस्त झाले असून, आणखी काही दिवस त्यातून सुटका होण्याची चिन्हे नाहीत.

राज्यातील प्रमुख शहरांचे आजचे तापमान असे ः नाशिक- ४१.५, धुळे- ४६, नंदुरबार-४६, नगर-४४, मालेगाव-४३, कुलाबा (मुंबई)- ३३.९, सांताक्रूझ (मुंबई)- ३३, नागपूर-४२.५, पुणे- ४१.९, महाबळेश्‍वर-३४.४, औरंगाबाद- ४२.४, सोलापूर- ४३ अंश सेल्सिअस.

देशातील प्रमुख महानगरांत तापमानात वाढ झाली आहे. अहमदाबाद- ४३.१, पणजी ३४.४, नवी दिल्ली- ३९.४, कोलकता- ३६, चेन्नई- ३६.२ असे तापमान होते. राज्यातील विविध शहरांत तापमान तीन ते साडेतीन अंश सेल्सिअसने वाढले आहे. नागरिकांना दुपारी घराबाहेर पडणे टाळून पंखे, वातानुकूलित यंत्रणांच्या आश्रयाला जावे लागत आहे. सक्तीच्या भारनियमनामुळे या समस्येत भर पडली आहे. पर्याय म्हणून अनेक नागरिक पर्यटनाला निघाले आहेत. रात्री उशिरापर्यंत या वातावरणाचा परिणाम जाणवत असल्याने नागरिकांच्या दिनचर्येवरही त्याचा परिणाम होत आहे. मुंबईत दमट हवामानामुळे नागरिकांना उन्हाचा तडाखा सुसह्य असला तरी त्यांना घामाने न्हाऊन निघावे लागत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेशच्या काही भागांत तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. दक्षिण कोकण, गोवा, मराठवाड्याचा काही भाग आणि उत्तर मध्य महाराष्ट्राला त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे आणखी काही दिवस ही स्थिती कायम राहण्याची चिन्हे आहेत.

Sunday, March 18, 2007

जिवन

मैत्री कशी ह्ळुवार उमलते
उन्हातही मग सावली वाटते
अश्रूत दु:ख वाहून जाते
व्यथांनाही ह्सू येते

मैत्रीविना सारेच फिके
आनंदाचे क्षणही मुके
म्हणूनच मैत्रीला फुलवायचे
फुलासारखे जपायचे
अन त्या सुगंधात
जीवन सुगंधी करायचे

जी माणसे हवीशी वाटतात
ती कधी भेटत नाही
जी माणसे नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही
ज्यांच्याकडे जावेशे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लागते

जेंव्हा जीवन नकोसे वाटते
तेंव्हा काळ संपत नाही
जीवनामध्ये सुरुवातीस
ज्यात अर्थ नाही असे वाटते
त्यातच खूप अथ भरलेला आहे
असे आयुष्याच्या शेवटी कळते
जेंव्हा जीवनाचा खरा अथ कळतो
तेंव्हा काळ संपलेला असतो

नशीब हे असच असते
त्याच्याशी जरा जपून वागाव लागते
तिथे कोणाचेच चालत नाही
जिकडे नेईल तिकडे जावेच लागते...

Saturday, November 04, 2006

पाऊस

आज ब~याच दिवसांनी अगदी मस्त पाऊस पडला. आणि मनाला एक वेगळाच ठंडावा देऊन गेला. पावसापूर्वीच्या आकाशाचे हे छायाचित्र आम्ही आमच्या कॉलेजच्या गच्चीवरून घेतला आहे.

Friday, November 03, 2006

किंग खानचा वाढदिवस

काल आम्ही शाहरूखचा वाढदिवस साजरा केला. वास्तविक शफ़ि हा शाहरूखचा निस्सिम चाहता आहे. आणि तो दरवर्षी शाहरूखचा वाढदिवस साजरा करतो. या वर्षी आम्ही त्याला मदत करायचे ठरवले. आम्ही मस्त केक आणि पेढे आणले होते. आम्ही केक कापला, मिठाई वाटली आणि खूप फोटो काढले. त्यापैकीच काही फोटो इथे केवळ आपल्यासाठी..




Google