Thursday, February 16, 2006

रोपट्याची व्यथा

एक क्षण जगण्यासाठी
कोमल रोपटं पाहत होतं वाट
एका मोत्याच्या थेंबाची...
तो होऊन आला दवबिंदू
पात्यावर ओघळण्यासाठी...
स्वतःच तेज घेऊन गेला
आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी...

कोमल रोपट्याला हवा होता आधार
ताठ उभे राहण्यासाठी...
तो होऊन आला तुफान
बेफ़ाम वागण्यासाठी...
आपल्याच पायी तुडवून गेला
शक्तीप्रदर्शन करण्यासाठी...

कोमल रोपट्याला आस होती
एका रिमझीम सरीची...
तोही आला आपल्याच ऋतूत
मुसळधार बरसण्यासाठी...
पाणीच पाणी करून गेला
आयुष्यभर गटकळण्यासाठी...

Tuesday, February 14, 2006

स्त्री जातीला प्रणाम

होय.. आज मी स्त्रीजातीला शतशः प्रणाम करतो. व हे मी पूर्ण शुद्धीत बोलत आहे. याला कारणही तसेच आहे. मी माझ्या मूळ ब्लॉग मध्ये लिहीलेला हा लेख वाचल्यास तुम्हालाही हे पटेल.

Thursday, February 09, 2006

मुझे अच्छा लगता है

अपने गमोंको जिंदा रखना
मुझे अच्छा लगता है
यूं ही अश्कोंको
पी पी कर जीना
मुझे अच्छा लगता है

हिल जाता है दिल
उसकी किसी पुरानी बात पे
उस बातको दोहराकर
उसकी यादों मे खो जाना
मुझे अच्छा लगता है

देने वाले ने दिये जख्म
इन ज्ख्मोंसे दोस्त की
तरह पेश आना
मुझे अच्छा लगता है

Tuesday, February 07, 2006

ओमकारेश्वर मंदीर

ओमकारेश्वर मंदीर

ओमकारेश्वर मंदीर


ओमकारेश्वर मंदीराचे एक रंगचित्र
ओमकारेश्वर मंदीराचे एक रंगचित्र

३ फ़ेब्रुवारी रोजी मी आणि धीरज ओमकारेश्वर मंदीरात गेलो होतो. हे मंदीर सदाशिवराव भाऊंच्या कालखंडात बांधले गेले. हे मंदीर त्याच्या दगडी बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. हे बांधकाम १९६२ सालच्या पानशेतच्या पूरामध्येदेखील सुरक्शित राहिले. या मंदिरातच चिमाजीअप्पांची समाधी आहे. याच ठीकाणी त्यांच्या पत्नी १७३७ साली सती गेल्या होत्या.

Monday, February 06, 2006

आठवण

जूळू लागलेल्या तारा आणि विरघळू लागलेले सूर
मनामनातून उसळलेली अनामीक हूरहूर
याच वळनावर भरून आलाय आज माझाही ऊर
तूझी आठवण कधीच सोडून जाणार नाही दूर

Wednesday, February 01, 2006

पैसा

त्याच्यासाठीच भर दरबारात
द्रोपदीचं वस्त्र फाडलं गेलं
फक्त त्याच्यासाठीच
राजा हरीश्चंद्राला
स्वप्न पाडलं गेलं...

अन् वेळोवेळी
पैसाच नसतो सर्व काही
असं म्हणताना
वास्तवाला मातीत गाडलं गेलं...

आजही त्याच्यासाठीच जो तो वेडावला आहे
पैशासाठी माय बहिणी
गहाण टाकणारा 'माणूस'
या कलयुगानं घडवला आहे..

माणसामध्ये असणारा
माणुसकीचा अंश
माणसाने आज
काढून फेकला आहे...

न्यायदानासाठी न्यायखुर्चीवर
बसवलेला न्यायाधिशही
पैशाने आज विकत घेतला आहे.

Tuesday, January 31, 2006

काही मराठी व्यक्तींच्या स्वाक्षर्या

मला स्वाक्षर्या जमवण्याचा छंद आहे. माझ्या संग्रहातील काही मराठी विभूतींच्या स्वाक्षर्या मी येथे आपल्यासमोर ठेवत आहे.


Autograph of Jayant Narlikar: By Dinesh Soni
जयंत नारळीकर

Autograph of Medhatai Patkar: By Dinesh Soni
मेधाताई पाटकर

Autograph of Ashok Saraf: By Dinesh Soni
अशोक सराफ़

Autograph of Narendra Dabholkar: By Dinesh Soni
्नरेंद्र दाभोळकर

Autograph of Col S S Hasabnis: By Dinesh Soni
्कर्नल एस एस हसबनिस

Autograph of Vijay Gokhale: By Dinesh Soni
्विजय गोखले

Autograph of Viju Khote: By Dinesh Soni
विजु खोटे

Autograph of Sameer Gaikwad: By Dinesh Soni
समीर गायकवाड

Autograph of Jaydev Patkar: By Dinesh Soni
्जयवंत वाडकर

Autograph of Vijay Patkar: By Dinesh Soni
्विजय पाटकर
Autograph of Pradeep Velankar: By Dinesh Soni
प्रदीप वेलनकर

Autograph of Milind Soman: By Dinesh Soni
मिलींद सोमन

Monday, January 30, 2006

प्रेम

एकदा तरी वळून पहा
मन थोडं जाळून पहा
मग समजतं प्रेम काय आहे
प्रेमात थोडं पडून पहा

प्रेम कधी करून पहा
जिंकली बाजू हरून पहा
जिंकणं सर्व काही नसतं
हरण्यात कधी जिंकून पहा

Monday, January 23, 2006

आयुष्याचं गणित


आयुष्याचं गणित एक
मांडून पाहिलं पाटीवर
उत्तर मात्र आलं नाही
काय चुकलं कळलं नाही

सुखाची बेरीज दुःखाची वजाबाकी
आशेचा गुणाकार निराशेचा भागाकार

कदाचित असं झालं असावं
मुळात गणितच चूक असावं
किंवा निदान मला तरी
आकड्यांचं भान नसावं

Sunday, January 22, 2006

एक उनाड दिवस

्अशोक सराफ, विजय पाटकर, विजू खोटे, विजय गोखले, आदी कलाकारमीत्रहो, माझा संगणक बंद पडल्यामूळे मी दोन दिवस काही लिहू शकलो नाही.
शुक्रवारी मी "एक उनाड दिवस" या मराठी चित्रपटाच्या प्रथम खेळासाठी (Premier Show) गेलो होतो. तेथे मी अशोक सराफ, विजय पाटकर, विजू खोटे, विजय गोखले, आदी कलाकारांशी भेटलो व त्यांच्या स्वाक्शर्या घेतल्या.
चित्रपट एकंदरित उत्तम आहे. नियमांमध्ये अटकून राहिलेल्या एका माणसाची ही कथा आहे जो एक दिवस वेगळा जगून पाहतो व या दुसर्या आयुष्यातील मजा अनुभवल्यानंतर त्याला आपल्या आयुष्याचा खरा अर्थ कळतो.
मी आपल्याला हा चित्रपट एकदा तरी पाहण्याचा सल्ला देईन.

छायाचित्र: धीरज जैन

Tuesday, January 17, 2006

चोरावर मोर

चोरावर मोर


चोरावर मोर
्नेहमी तक्रार केली जाते की PMT बसेस व PMT खाते रस्त्यांवर अतिक्रमन करते. मात्र जेव्हा या दुचाकी कर्ज देणार्या संस्थेने PMT स्टॉपवरच अतिक्रमन केले तेव्हा "चोरावर मोर" असे म्हणायची पाळी आली.

Saturday, January 14, 2006

मी महाराष्ट्राचा शत्रू

आज मी एक ब्लॉग पाहिला जो Save Maharashtra या शिर्षकाखाली वावरत आहे. या ब्लॉगमधील एक लेखाने मला स्वतःबद्दल विचार करायला लावले. लेखकाचे विचार मी इथे मांडत आहे.

Who are Enemies of Maharashtra?
Non Maharashrians who

Especially Marwadis who Lends money to Poor Marathi farmers on a whooping interest rates or on return to signiture on blank papers.They know that farmers will not able to return their loans , these thieves get the chance of grabbing their land .Marawadis and Gujarati community in Maharshtra are the main culprits of farmers sucides in Vidharbha and Marathwada region.


हे वाचल्यावर मी स्वतःबद्दल विचार केला. मी एक मारवाडी आहे. खरच असे काही होते का? मला असे वाटते की लेखक परिमल हा खूप जास्त चित्रपट जगात वावरत आहे व त्यालाच वास्तव समजून वागतोय. या सर्व गोष्टी केवळ चित्रपटांतच छान वाटतात. कदाचित परिमल एक गोष्ट जाणत नाही कि सध्या सर्व शेतकरी (मराठी अथवा बिगरमराठी) ग्रामिण बॅंकांतून अथवा पतपेढ्यांतून कर्ज घेतात. सावकारी पद्धत फार पूर्वी बंद झाली आहे.

जाता जाता मी एक सांगू इच्छितो की मी स्वतः मराठवाड्याचाच आहे. त्यामूळे मी हे खात्रीपूर्वक सांगू शकतो की मराठवाड्याबाबतचे लेखकाचे मत पूर्णत: चूक आहे.

या ब्लॉगला एका शिवसैनिकाने दिलेले उत्तर वाचनिय आहे.

मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा


तिळ गुळाच्या अमर मैत्रीला
बघून मनात उमटे गुंजन
असा असावा असा रहावा
तुमचा अमुचा स्नेह चिरंतन

मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा

Friday, January 13, 2006

लातूरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के

मागील धक्क्यानंतर केवळ एक आठवड्याच्या आत बसलेल्या दुसर्या धक्क्यामुळे लातूर भागात घबराटीचे वातावरण आहे. यासंबंधीची बातमी या ठिकाणी उपलब्ध आहे.

छतावर स्वच्छतागॄह व तळमजल्यावर शोषखड्डा

गाव हागणदारीमुक्त करायचं म्हटलं की स्वच्छतागॄह बांधावे लागते हे खरे! पण ते बांधावे कुठे हा खरा प्रश्न. या प्रश्नावर रामेश्वरकरांनी कशी मात केली याची ही कथा.

Google