Monday, March 27, 2006

आठवण

आठवून पाहायचो मी काही पावसाळे
तिच्या-माझ्या संगतीत भिजलेले
हवेभोवती गंध घेवून
रानोमाळ पसरलेले. . .

आठवायचा अवचीत मग तो नदीकाठ
कमळ फुलांनी बहरलेला
चांदणीची वाट पाहत मग
तो चंद्र रात्र जागलेला. . .

जाणवायची नकळत मग ती बोचरी थंडी
गुलाबी स्वप्नातून जागवणारी
नुसतीच मग एक निरर्थक धडपड
अपूर्णततेही पूर्णत्व शोधणारी. . .

आठवून यायची, तीची सारी वचने
अशीच कुठेशी मोडून पडलेली
प्रतिसादांना शोधणारी तीची प्रत्येक हाक
नियतीने माझ्यापासून दूर लोटलेली. . .

दाटलेलं धुकं मग सावकाश पाझरायचं
ओल्या होवून जायच्या तिच्या सगळया "आठवणी"
एखाद-दुसरां मग त्या चुकार थेंबानी
उगीचचं भरुन यायची माझी गोठलेली "पापणी"

Thursday, March 09, 2006

तुझी आठवण


तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी
तू गेलीस,
पण ती मात्र
बिलगून राहीली..

तू जाताना
मी तूला
हसून निरोप दिला..
पण नंतरच्या माझ्या कोसळण्याची
साक्षीदार होती
तुझी आठवण.....

तू गेल्यावर
विरहाचा श्रावण बरसला..
तेव्हा हळूच येऊन
माझे अश्रू पुसणारी होती
तुझी आठवण.....

तुझ्यापेक्षा तुझी आठवण बरी
तू गेलीस,
पण ती मात्र
बिलगून राहीली..

Google