Monday, May 29, 2006

मोसमी पाऊस कोकणात दाखल

नैर्ऋत्य मोसमी पाऊस आज कोकण किनारपट्टीवर दाखल झाला. केरळमधील आगमनानंतर वेगाने आगेकूच करीत अवघ्या तिसऱ्या दिवशी तो वेंगुर्ल्यात येऊन पोचला. .......
केरळ, संपूर्ण कर्नाटक किनारपट्टी, गोवा, उत्तर कर्नाटक, रायलसीमा, आंध्र किनारपट्टी, बंगालच्या उपसागराचा ईशान्येकडील भाग, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश आदी भाग मोसमी पावसाने व्यापला आहे. येत्या २४ तासांत पश्‍चिम बंगाल आणि सिक्कीम येथे त्याचे आगमन होण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविला आहे. मोसमी पावसाचा अक्ष सध्या वेंगुर्ला, बळ्ळारी, ओंगल आणि गंगटोक या ठिकाणांवर स्थिरावला आहे.

सर्वसाधारणपणे आठ जूनच्या सुमारास मोसमी पाऊस पुण्यात दाखल होतो. यंदा तो लवकर दाखल झाल्याने आणि त्यानंतर वेगाने आगेकूच करीत असल्याने पुण्यातही त्याचे वेळेआधीच आगमन होण्याची शक्‍यता आहे; मात्र तो नेमका कधी पुण्यात दाखल होईल, याचे संकेत अद्याप मिळाले नसल्याचे येथील वेधशाळेच्या संचालक (हवामान अंदाज) रोहिणी लेले यांनी सांगितले.

पुण्यात आज दिवसभर ढगाळ हवामान होते. सायंकाळच्या सुमारास आकाश अंधारूनही आले होते. काही वेळ जोराचा वारा सुटला; मात्र पाऊस झाला नाही. पुण्याचे कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले. येत्या २४ तासांत शहरात पाऊस होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे; तसेच दक्षिण कोकण, गोवा, कर्नाटक किनारपट्टी, केरळ, आसाम, मेघालय, नागालॅंड आदी ठिकाणी जोराचा पाऊस होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.



-------------------
ताजा कलम:

काही वेळापूर्वी पूण्यात पावसाला सुरूवात झाली. नैर्ऋत्य मोसमी पाऊस पूण्यात आला.

Sunday, May 28, 2006

आरक्षणाचे भविश्य


्तुम्हाला हेच हवे आहे का?

पाऊस

काल पाऊस झाला. परवा पण झाला होता. मग फरक काय दोन्हीमध्ये? आहे.. नक्कीच आहे..
परवाचा पाऊस घेऊन आला होता भूतकाळ, आठवणी आणि अश्रू..
आणि कालचा पाऊस घेऊन आला भविश्य, आशा, विश्वास आणि हास्य..

मला मुंबईच्या Akna Infotech या कंपनीत नौकरी मिळाली. आणी ही वार्ता मिळाल्यावर थोड्याच वेळात पाऊस आला.. जणू हा पाऊस माझे अभिनंदन करायला आला होता..

Friday, May 26, 2006

पहिला पाऊस

आज अखेर पुण्यात पाऊस झाला. आणि सोबत बर्याच आठवणी घेऊन आला. गेल्या वर्षीचे पहिल्या पावसात एकत्र भिजणे मला आठवले. आणि आठवले तिचे अचानक माझ्या आयुष्यातून निघून जाणे...


पहिला पाऊस
मनात भरलेला
ह्रदयापर्यंत जाऊन
आठवणीत भिजलेला

भिजवूनी माती
जागविल्या स्मृती
हर एक थेंबातूनी
जाग्या झाल्या राती

झालं आभाळ सुनं
गाणं संपलं पावसाचं
आठवतं मला तेव्हा
तुझं असच निघून जाणं

Google