साखर कारखान्यांचे अहवाल किंवा जाहिराती वाचल्या तर त्यात आमचा कारखाना कशी पांढरी शुभ्र आणि दाणेदार साखर बनवतो, याचे वर्णन असते. मुळात साखर पांढरी आणि दाणेदार हवीच का, ती पांढरी बनविण्याची प्रक्रिया कोणती, तिचे फायदे-तोटे काय, तोट्यांचा विचार केल्यावर साखर पांढरी करण्याचा आग्रह करायचाच कशाला, याविषयी... .......
साखर दुसऱ्या पदार्थात विरघळल्यानंतर तिची गोडी त्या पदार्थात उतरते; साखरेचा रंग नव्हे. असे असेल तर मग साखरेचा रंग पांढराच असला पाहिजे, हा अट्टहास कशासाठी? साखरेचा रंग काहीसा तपकिरी असला तरी काहीच बिघडत नाही. उलट पांढऱ्या साखरेपेक्षाही तपकिरी रंगाची साखर अधिक आरोग्यदायी असते. साखरेला पांढरा रंग देण्यासाठी त्यावर गंधक आणि रासायनिक पदार्थ वापरून प्रक्रिया करावी लागते. त्यांचा अंश पांढऱ्या साखरेतही उतरतो. या प्रक्रियेत उसाच्या रसातील उपयुक्त अन्नद्रव्ये काढून टाकली जातात. म्हणजेच आग्रहाने पांढरी साखर खाणे म्हणजे विषारी साखर शरीरात ढकलण्यासारखेच आहे. म्हणूनच, ग्राहकांनी साखरेचा दर्जा तिच्या रंगावरून ठरवता कामा नये. साखरेच्या पांढऱ्या रंगाबाबत जसा ग्राहकांचा हट्ट असतो, तसाच तो साखर स्फटिकांच्या (सीरर्पीश्रशी) आकाराबाबतही
असतो. साखरेच्या दाण्यांचा आकार लहान असल्याने किंवा टपोरा असल्याने साखरेच्या गुणवत्तेत आणि चवीत काहीच फरक पडत नाही. पांढऱ्याच रंगाची आणि दाणेदार साखरेच्या हट्टापायी साखरेची निर्मितिप्रक्रिया अकारण लांबते. त्यामुळे उत्पादन खर्चातसुद्धा नाहक वाढ होते. रासायनिक प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाची समस्याही निर्माण होते. "स्पेंट वॉश'चा निचरा करणे अनेक कारखान्यांना शक्य न झाल्याने जमिनी क्षारयुक्त होणे, त्या परिसरातील भूजलाचा रंग बदलणे असे प्रकार घडतात. त्यामुळे ग्राहकांनी पांढऱ्या साखरेचा आग्रह सोडून देऊन नैसर्गिक स्वरूपातील मातकट- तपकिरी साखर वापरली पाहिजे. यामुळे उत्पादन खर्चातही कपात करणे कारखान्यांना शक्य होईल व आरोग्यदायी साखर ग्राहकांना मिळू शकेल.
Tuesday, July 10, 2007
पांढऱ्या साखरेचा आग्रह कशासाठी?
लेखक Dinesh ्वेळ 4:23 AM 3 ्जणांनी मते नोंदवली
Subscribe to:
Posts (Atom)