Tuesday, January 31, 2006

काही मराठी व्यक्तींच्या स्वाक्षर्या

मला स्वाक्षर्या जमवण्याचा छंद आहे. माझ्या संग्रहातील काही मराठी विभूतींच्या स्वाक्षर्या मी येथे आपल्यासमोर ठेवत आहे.


Autograph of Jayant Narlikar: By Dinesh Soni
जयंत नारळीकर

Autograph of Medhatai Patkar: By Dinesh Soni
मेधाताई पाटकर

Autograph of Ashok Saraf: By Dinesh Soni
अशोक सराफ़

Autograph of Narendra Dabholkar: By Dinesh Soni
्नरेंद्र दाभोळकर

Autograph of Col S S Hasabnis: By Dinesh Soni
्कर्नल एस एस हसबनिस

Autograph of Vijay Gokhale: By Dinesh Soni
्विजय गोखले

Autograph of Viju Khote: By Dinesh Soni
विजु खोटे

Autograph of Sameer Gaikwad: By Dinesh Soni
समीर गायकवाड

Autograph of Jaydev Patkar: By Dinesh Soni
्जयवंत वाडकर

Autograph of Vijay Patkar: By Dinesh Soni
्विजय पाटकर
Autograph of Pradeep Velankar: By Dinesh Soni
प्रदीप वेलनकर

Autograph of Milind Soman: By Dinesh Soni
मिलींद सोमन

Monday, January 30, 2006

प्रेम

एकदा तरी वळून पहा
मन थोडं जाळून पहा
मग समजतं प्रेम काय आहे
प्रेमात थोडं पडून पहा

प्रेम कधी करून पहा
जिंकली बाजू हरून पहा
जिंकणं सर्व काही नसतं
हरण्यात कधी जिंकून पहा

Monday, January 23, 2006

आयुष्याचं गणित


आयुष्याचं गणित एक
मांडून पाहिलं पाटीवर
उत्तर मात्र आलं नाही
काय चुकलं कळलं नाही

सुखाची बेरीज दुःखाची वजाबाकी
आशेचा गुणाकार निराशेचा भागाकार

कदाचित असं झालं असावं
मुळात गणितच चूक असावं
किंवा निदान मला तरी
आकड्यांचं भान नसावं

Sunday, January 22, 2006

एक उनाड दिवस

अशोक सराफ, विजय पाटकर, विजू खोटे, विजय गोखले, आदी कलाकारमीत्रहो, माझा संगणक बंद पडल्यामूळे मी दोन दिवस काही लिहू शकलो नाही.
शुक्रवारी मी "एक उनाड दिवस" या मराठी चित्रपटाच्या प्रथम खेळासाठी (Premier Show) गेलो होतो. तेथे मी अशोक सराफ, विजय पाटकर, विजू खोटे, विजय गोखले, आदी कलाकारांशी भेटलो व त्यांच्या स्वाक्शर्या घेतल्या.
चित्रपट एकंदरित उत्तम आहे. नियमांमध्ये अटकून राहिलेल्या एका माणसाची ही कथा आहे जो एक दिवस वेगळा जगून पाहतो व या दुसर्या आयुष्यातील मजा अनुभवल्यानंतर त्याला आपल्या आयुष्याचा खरा अर्थ कळतो.
मी आपल्याला हा चित्रपट एकदा तरी पाहण्याचा सल्ला देईन.

छायाचित्र: धीरज जैन

Tuesday, January 17, 2006

चोरावर मोर

चोरावर मोर


चोरावर मोर
्नेहमी तक्रार केली जाते की PMT बसेस व PMT खाते रस्त्यांवर अतिक्रमन करते. मात्र जेव्हा या दुचाकी कर्ज देणार्या संस्थेने PMT स्टॉपवरच अतिक्रमन केले तेव्हा "चोरावर मोर" असे म्हणायची पाळी आली.

Saturday, January 14, 2006

मी महाराष्ट्राचा शत्रू

आज मी एक ब्लॉग पाहिला जो Save Maharashtra या शिर्षकाखाली वावरत आहे. या ब्लॉगमधील एक लेखाने मला स्वतःबद्दल विचार करायला लावले. लेखकाचे विचार मी इथे मांडत आहे.

Who are Enemies of Maharashtra?
Non Maharashrians who

Especially Marwadis who Lends money to Poor Marathi farmers on a whooping interest rates or on return to signiture on blank papers.They know that farmers will not able to return their loans , these thieves get the chance of grabbing their land .Marawadis and Gujarati community in Maharshtra are the main culprits of farmers sucides in Vidharbha and Marathwada region.


हे वाचल्यावर मी स्वतःबद्दल विचार केला. मी एक मारवाडी आहे. खरच असे काही होते का? मला असे वाटते की लेखक परिमल हा खूप जास्त चित्रपट जगात वावरत आहे व त्यालाच वास्तव समजून वागतोय. या सर्व गोष्टी केवळ चित्रपटांतच छान वाटतात. कदाचित परिमल एक गोष्ट जाणत नाही कि सध्या सर्व शेतकरी (मराठी अथवा बिगरमराठी) ग्रामिण बॅंकांतून अथवा पतपेढ्यांतून कर्ज घेतात. सावकारी पद्धत फार पूर्वी बंद झाली आहे.

जाता जाता मी एक सांगू इच्छितो की मी स्वतः मराठवाड्याचाच आहे. त्यामूळे मी हे खात्रीपूर्वक सांगू शकतो की मराठवाड्याबाबतचे लेखकाचे मत पूर्णत: चूक आहे.

या ब्लॉगला एका शिवसैनिकाने दिलेले उत्तर वाचनिय आहे.

मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा


तिळ गुळाच्या अमर मैत्रीला
बघून मनात उमटे गुंजन
असा असावा असा रहावा
तुमचा अमुचा स्नेह चिरंतन

मकरसंक्रातीच्या हार्दिक शुभेच्छा

Friday, January 13, 2006

लातूरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के

मागील धक्क्यानंतर केवळ एक आठवड्याच्या आत बसलेल्या दुसर्या धक्क्यामुळे लातूर भागात घबराटीचे वातावरण आहे. यासंबंधीची बातमी या ठिकाणी उपलब्ध आहे.

छतावर स्वच्छतागॄह व तळमजल्यावर शोषखड्डा

गाव हागणदारीमुक्त करायचं म्हटलं की स्वच्छतागॄह बांधावे लागते हे खरे! पण ते बांधावे कुठे हा खरा प्रश्न. या प्रश्नावर रामेश्वरकरांनी कशी मात केली याची ही कथा.

Wednesday, January 11, 2006

थोडेसे स्वतःबद्दल

सर्वप्रथम माझ्या पहिल्या लेखाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल शॆलेश आणि अकिरा यांचे आभार.
मला असे वाटते की आधी मी स्वतःबद्दल थोडेसे लिहावे. मी दिनेश सोनी. मूळ मराठवाड्यातील लातूरचा. सध्या पूण्याच्या MIT या महाविद्यालयातून माहिती व तंत्रन्यान अभियांत्रिकी क्शेत्रात प्रशिक्शन घेत आहे.
माझे छंद ट्रेकिंग, छायाचित्रण, व भटकंती. त्याचप्रमाणे मी बर्याच सामाजिक कार्यांमध्येदेखिल भाग घेतो.
जर आपणांस ट्रेकिंग मध्ये आवड असेल, अथवा सामाजिक कार्यांमध्ये भाग घ्यायचा असेल तर आपण मला ९८९०८९७१९८ या क्रमांकावर संपर्क साधू शकता अथवा dinesh.soni@gmail.com या ठिकाणी मेल करू शकता.
अच्छा, पुन्हा भेटूया.

Tuesday, January 10, 2006

माझी विचारसरणी

का चालावी नेहमी पुढच्याचीच वाट
ज्यावरून चालताना पडायला होतं

कधी कधी आपणच शोधावी अशी वाट
ज्यावरून ताठ मानेनं चालायला होतं

Google