Saturday, September 30, 2006

माझी नेम प्लेट

आता मी lecturer असल्यामुळे माझ्या टेबलवर माझे नाव असलेली नेम प्लेट असणे आवश्यक आहे. हो ना?
तर त्या नेम प्लेटचेच हे काही फोटो..


"लगे रहो मुन्नाभाई' स्वतंत्रपणे ऑस्करसाठी पाठविणार!

"ऑस्कर' पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटाच्या गटासाठी भारतातर्फे "रंग दे बसंती' हा चित्रपट पाठविण्यात आला असला तरी "लगे रहो मुन्नाभाई' हा सध्या गाजणारा चित्रपट स्वतंत्रपणे "ऑस्कर' स्पर्धेत भाग घेणार आहे. .......
अमेरिकेतील "इरॉस इंटरनॅशनल'च्या वतीने केन नाज या चित्रपटाच्या ऑस्करमधील सहभागाचा अर्ज भरणार आहेत.

"फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया'तर्फे दरवर्षी ऑस्करसाठी भारतातून एक चित्रपट पाठविला जातो. काही दिवसांपूर्वी या संस्थेच्या सदस्यांनी "रंग दे बसंती'ला "ऑस्कर'साठी प्राधान्य दिले होते. गेल्या काही दिवसांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत "फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया'च्या या निर्णयाबद्दल चर्चा सुरू होती. चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी "रंग दे बसंती'च्या तुलनेत "लगे रहो मुन्नाभाई'ला ऑस्कर स्पर्धेत यश मिळण्याची अधिक संधी आहे, असे मत व्यक्त केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर "लगे रहो मुन्नाभाई'चे निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी आपला चित्रपट स्वतंत्रपणे ऑस्करसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातील असंख्य "फॅन्स'नी ई मेलद्वारे आम्हाला आमच्या चित्रपटाबद्दल पसंती कळवली असल्याने "ऑस्कर' स्पर्धेत स्वतंत्रपणे आपण सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असे चोप्रा यांनी स्पष्ट केले आहे.

अमेरिकेत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात या चित्रपटाचा एक खास "शो' येत्या २७ तारखेला होणार आहे. त्यावेळी या विद्यापीठातील विद्यार्थी तसेच हॉलीवूडमधील प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जॉर्ज लुकास, रॉन हॉवर्ड, जेम्स आयव्हरी यांसारख्या मान्यवरांनी या विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.


--------------------
ये हुईना बात...

Friday, September 29, 2006

तो मीच आहे.. !!!


या राजबिंड्या तरुणाबद्दल काही बोलायची गरज आहे का? well, हा मझा नुकताच घेतलेला एक फोटो..

Sunday, September 17, 2006

जमलंच नाही

जमलंच नाही ..!
जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...

रोज संध्याकाळी तिला चौपाटीवर फिरवायला ,
तिच्या निळ्या डोळ्यांत स्वतःला हरवायला ,
वाळूत बंगला बांधता बांधता..
आलं असतं मनातलं सांगता..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं..

कधीतरी तिच्यासोबत बागेमध्ये जायला ,
एकच कॅडबरी दोघांमधे वाटून खायला ,
कधी खोडी काढली असती..
आणखी गोडी वाढली असती..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...

तिचा हात हळुवारपणे आपल्या हातात घ्यायला ,
लता-रफ़ी, किशोर-आशा ड्युएट गाणं गायला ,
सूर कदाचित जुळले असते..
तिला मनातले कळले असते..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

आपल्यालाही आवडलं असतं...

निघताच निघता तिला बावरलेलं पाहायला ,
मला तिची ,तिला माझी शपथ वाहायला ,
माझे अश्रू माझ्या डोळ्यांत लपले असते..
तिचे मात्र दवासारखे जपले असते..

पण जाऊ दे जमलंच नाही ..!

Thursday, September 07, 2006

देवाला पाण्यात घाला !!!

कधी विचार केलाय की थोड्याशा पावसाने महाराष्ट्रात पूर का येतो? का वाढते पाण्याची पातळी इतक्या लवकर? काय होते त्या लाखो गणेश मुर्त्यांचे ज्या आपण दरवर्षी जलार्पन करतो?
१*१ फ़ूटाच्या एका मुर्तीत अंदाजे १ किलो शाडू वापरली जाते. अशा लाखो मुर्त्यांपासून तयार होणारी लाखो टन शाडू गाळ बनून पाण्याच्या पायथ्याशी साजून राहते. यामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात बदलते. शिवाय मुर्ती बनवताना वापरण्यात येणा~या क्रुत्रीम रंगांचे पाण्य़ावर व जलचरांवर होणारे दुष्परिणाम सांगायची काही गरज नाही. सुञास कथन न लगे !!
या वर्षी मी स्वतः एक प्रयोग केला. गणेशमुर्ती मी स्वतःच्या घरी एका टोपल्यात विसर्जीत केली. २४ तास उलतून गेल्यावरही अद्याप २% देखील प्रुथक्करण झालेले नाही आहे. या वरून आपण अंदाज लावू शकता की जलचरांना किती दिवसांपर्यंत हा त्रास सहन करावा लागतो..
टिळकांनी गणेशचतुर्थीचा सण सुरू केला तेव्हा हा विचार नक्कीच केला नसणार..
एका मोठ्या कलाकाराने काही महिन्यांआधी "देवाला पाण्यात घाला" असे विधान केले होते. मी म्हणेन "खुशाल घाला, पण घरच्या पाण्यात. सार्वजनिक पाण्यात नाही" !!!

साथ

हवी कशाला साथ कुणाची,
माझेच आकाश अन् माझी धरती...
असाच एकटा चालत राहीन,
आभाळ घेऊनी खांद्यावरती...

Wednesday, September 06, 2006

माझी भटकंती

भटकंती. हा शब्द तसा पूर्वीपासूनच परिचयाचा. मात्र हा शब्द माझ्या आयुष्याचा भाग बनून जाईल असे कधी वाटले नव्हते. माझ्या भटक्या आयुष्याची सुरूवात झाली मझ्या अभियांत्रीकीच्या तीसर्या वर्षी. तसं तर मी सुरूवात पेब या थोड्या कठिण गडापासून केली. मात्र खर्या अर्थाने मला आवड निर्माण झाली ती लोहगड या गडापासून. तत्पूर्वी सरसगड या गडाला पाहून मला चढायची इच्छा झाली होती. त्याबद्दल पुढे बोलेनच.
आजवर मी भेट दिलेल्या गडांविषयी थोडेसे सांगण्याचा हा प्रयत्न.

लोणावळ्याजवळ असणारा लोहगड पूर्वीपासून बोरघाटाचा रक्षक म्हणून कार्यरत होता. विंचू काटा ही नैसर्गिक माची, अभेद्य तटबंदी ही या गडाची वैशिष्ट्ये.. हा गड पुणे - मुंबई महामार्गावरून हमखास नजरेस पडतो.


लगतचा विसापूर किल्ला हा त्याच्या अखंड तटबंदीमूळे प्रसिद्ध आहे. मळवली स्थानकावरून समोर लोहगड नजरेस येतो. पण डोंगरामागे लपलेला विसापूर मात्र भजे गावात गेल्यावरच दिसून येतो. पूर्वीपासून दुर्लक्षित असा हा किल्ला इतिहासात फारसे स्थान मिळवू शकला नाही.


तिकोना हा गड प्रथमच trekking च्या उद्देशाने चढलो. हा छोटेखानी किल्ला तुंगच्या जोडीने पूर्वी checkpost प्रमाणे वापरला जायचा. हा गड नंतर प्रत्येक ऋतूत आणि दिवसाच्या प्रत्येक वेळी मी केला आहे. या गडावरून दिसनारे सौंदर्य अगदीच अवर्णनीय आहे. समोर पसरलेला पवना जलाशय आणि उत्तुंग असा तुंग ही जोडी सौंदर्याची अगदी लयलूट करते.


शेजारचा तुंग देखील मी एकदा चढलेलो आहे. इथून दिसणारी लोहगड-विसापूरची जोडगोळी व त्यांचे सौंदर्य शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य. किल्ल्याच्या नावावरून असे वाटते की हा गड चढायला खूप अवघड असेल. मात्र असे नाही आहे. हा छोटासा गड दोन तासात चढून व पाहुन होतो.


सुधागड हे भोर संस्थानचे वैभव. भोराईदेवीचे स्थान असल्यामुळे या गडाला भोरपगड असेही म्हटले जाते. झाडांमध्ये वसलेल्या या गडाचा विस्तार प्रचंड आहे. त्याचप्रमाणे गडावर होणारी निसर्गाची मुक्त उधळन ही एकदातरी अनुभवायलाच हवी. या गडाची तटबंदी आजही बर्याच प्रमाणात शाबूत आहे.


विद्येची देवता असलेल्या गणेशाच्या पाली या गावाला लागूनच उभ्या असलेल्या सरसगड या गडाला पाहून मला सर्वप्रथम trekking ची इच्छा झाली. पाली गावच्या दक्षिणोत्तर दिशेला या गडाची नैसर्गिक भिंत उभी आहे. या गडाचा वापर मुख्यत्वे टेहाळणीकरिता केला जात असे.


"गडांचा राजा व राजांचा गड" असा उल्लेख राजगड या गडाविषयी केला जातो. बुलंद, बेलाग व बळ्कट राजगड आजही आपल्या हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. पुण्यापासून ४८ किमी अंतरावर नीरा - वेळवंडी - कानंदी - गुंजवणी नद्यांच्या खो~याच्या बेचक्यात मुरूंबदेवाच्या डोंगरावर हा गड उभा आहे. हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या या गडाने तब्बल २३ वर्षे हा मान बाळगला. तीन नैसर्गिक माच्या व कठिण बालेकिल्ला यामुळेच हा गड बेलाग आहे.


माथेरानसारख्या गर्दीच्या ठिकाणाहून थोडे बाजूला असलेला पेब हा सूंदर गड निसर्ग्प्रेमींसाठी नक्कीच एक सुखद बदल आहे. इथे असणारी नैसर्गिक गुहा तसेच गुहेसमोरचे द्रुश्य हे शब्दांत वर्णने अवघड आहे. गड चढताना जंगल मात्र थोडेसे घनदाट आहे. वरून दिसणारे सुर्योदय व सुर्यास्त मी कधीच विसरनार नाही.


रायगड ही छत्रपतींची राजधानी. महाडपासून २५ किमीवर असणारा हा गड विस्ताराने बराच मोठा आहे. व चांगल्या प्रकारे जतनदेखील केला गेलेला आहे. याच गडावर छत्रपतींची समाधीदेखील आहे. इथून चहूबाजूंना दिसनारे सह्याद्रीचे अक्राळ-विक्राळ रूप पाहून हबकून जायला होते. छत्रपतींच्या पावन स्पर्शामूळे या गडास एका देवस्थानाचा दर्जा आहे.


पुण्यापासून ३० किमी अंतरावर असणारा सिंहगड हा दुरदर्शनच्या मनो~यामुळे चटकन लक्षात येतो. या गडावर घडलेला तानाजी मालुसरेचा इतिहास ऐकून गहिवरून येते. आज मात्र हा गड अगदी विषन्न अवस्थेत आप्ल्या शेवट्च्या घटका मोजत आहे.


महाराष्ट्रातील सर्व किल्ल्यामध्ये सर्वात शेवटी बांधलेला किल्ला म्हणजे मल्हारगड. पुण्यापासून जवळच असणारा हा किल्ला साधारनतः त्रिकॊणी असून आतील बालेकिल्ल्यास चौकोनी आकाराचा तट आहे. तटबंदी व बुरूजाची काही प्रमाणात पडझड झाली असली तरी ब~याच प्रमाणात ती शाबूत आहे. जवळच असणा~या सोनोरी गावामुळे या गडाला 'सोनोरी' असेही म्हटले जाते.


कोयना नदीच्या खो~यात घनदाट वनराजींमध्ये लपलेले दुर्गरत्न म्हणजे वासोटा. वाघांच्या सानिध्यामुळे या गडाला व्याघ्रघड असेही म्हटले जाते. या गडावरून दिसणारे कोयना पाणलोट क्षेत्राचे सौंदर्य अगदी अवर्णनीय आहे. तसेच नव्या व जुन्या वासोट्याच्या मध्ये असणार्या बाबुकडा या कडेवरून येणारा प्रतिध्वनी अनुभवायलाच हवा.


एखाद्या गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा उत्तम नमुना म्हणजे हरिश्चंद्रगड. या गडाचा इतिहास कुतुहलजनक तर भूगोल विस्मयजनक आहे. कोकणगडा हा या गडाचा सर्वात विस्मयजनक भाग. १.४ किमी उंच व १.४ किमी त्रिज्या असणारा हा अंतर्वक्र कडा हा कोकणातून वाहणा~या वा~यामुळे तयार झालेला आहे. इथे उभे राहून भन्नाट वा~याचा अनुभव घेतल्यानंतर हा आयुष्यातला सर्वोच्च बिंदू वाटेल.


भोरपासून अगदी जवळ असलेला रोहिडा हा छोटासा किल्ला २ तासांत पाहून होतो. गडावरून दिसणारे राजगड व येसाजी कंक तलावाचे मनोहारी दर्शन मनाला आनंद देऊन जाते.




छत्रपतींचे जन्मस्थान असलेला शिवनेरी हा किल्ला चढायला अगदी सोपा आहे. ऐतिहासिक द्रुष्ट्या महत्त्वाचा असल्याकारणाने हा सुंदर किल्ला ब~याच प्रमाणात संरक्षित केलेला आहे. जुन्नर शहरात प्रवेश करताच हा किल्ला दिसू लागतो. अशा या सुंदर गडाचा सहवास मात्र मला अगदी अल्प वेळ लाभला.

या प्रत्येक ठिकाणाबद्दल मी पुढे विस्ताराने लिहिणारच आहे. अपेक्षा आहे आपल्याला आवडेल. आपल्या प्रतिक्रीयांच्या प्रतिक्षेत...

Saturday, September 02, 2006

दु:ख

दु:खाच्या घरी एकदा
जमली होती पार्टी
दारु बीरू पीऊन अगदी
झींगली होती कार्टी...

दु:ख म्हणाले "दोस्तांनो!!"
बिलकुल लाजू नका
इतके दिवस छ्ळल म्हणून
राग मानू नका!!

मनात खूप साठल आहे
काहीच सुचत नाही
माझी 'स्टोरी' सांगीतल्या शिवाय
आता राहवत नाही...

मी आणि सुख दोघे
जुळे भाऊ होतो
पाच वर्षांचे होतो तेंव्हा
जत्रेत गेलो होतो...

गर्दी अशी जमली
नी गोंधळ असा उठला...
माणसांच्या त्या गर्दी मध्ये
सुखाचा हात सुटला!!

तेंव्हा पासून फिरतोय शोधत
दुनियेच्या जत्रेत
दिसतोय का 'सुख' माझा
कोनाच्या ही नजरेत...

सुखा बरोबरचे लहानपणीचे
क्षण त्याला स्मरले
आणि सुखाच्या आठवणीने
दुःख ढसाढसा रडले!!

नशा सगळ्यांची उतरली
दुःखाकडे पाहून!
दुःखालाही सुख मिळावे
वाटले राहून राहून...

सुखाच्या शोधामध्ये आता
मी सुध्दा फिरतोय
दुःखाला शांत करायाचा
खूप प्रयत्न करतोय...

जीवनाच्या रथाचे
आहेत सुख-दुःख सारथी
सुख मिळाले तर दुःखाच्या घरी
मीच देईन पार्टी!!

Google