"ऑस्कर' पुरस्काराच्या सर्वोत्कृष्ट विदेशी चित्रपटाच्या गटासाठी भारतातर्फे "रंग दे बसंती' हा चित्रपट पाठविण्यात आला असला तरी "लगे रहो मुन्नाभाई' हा सध्या गाजणारा चित्रपट स्वतंत्रपणे "ऑस्कर' स्पर्धेत भाग घेणार आहे. .......
अमेरिकेतील "इरॉस इंटरनॅशनल'च्या वतीने केन नाज या चित्रपटाच्या ऑस्करमधील सहभागाचा अर्ज भरणार आहेत.
"फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया'तर्फे दरवर्षी ऑस्करसाठी भारतातून एक चित्रपट पाठविला जातो. काही दिवसांपूर्वी या संस्थेच्या सदस्यांनी "रंग दे बसंती'ला "ऑस्कर'साठी प्राधान्य दिले होते. गेल्या काही दिवसांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत "फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया'च्या या निर्णयाबद्दल चर्चा सुरू होती. चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी "रंग दे बसंती'च्या तुलनेत "लगे रहो मुन्नाभाई'ला ऑस्कर स्पर्धेत यश मिळण्याची अधिक संधी आहे, असे मत व्यक्त केले होते. त्या पार्श्वभूमीवर "लगे रहो मुन्नाभाई'चे निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी आपला चित्रपट स्वतंत्रपणे ऑस्करसाठी पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. जगभरातील असंख्य "फॅन्स'नी ई मेलद्वारे आम्हाला आमच्या चित्रपटाबद्दल पसंती कळवली असल्याने "ऑस्कर' स्पर्धेत स्वतंत्रपणे आपण सहभागी होण्याचा निर्णय घेतला, असे चोप्रा यांनी स्पष्ट केले आहे.
अमेरिकेत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठात या चित्रपटाचा एक खास "शो' येत्या २७ तारखेला होणार आहे. त्यावेळी या विद्यापीठातील विद्यार्थी तसेच हॉलीवूडमधील प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. जॉर्ज लुकास, रॉन हॉवर्ड, जेम्स आयव्हरी यांसारख्या मान्यवरांनी या विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे.
--------------------
ये हुईना बात...
Saturday, September 30, 2006
"लगे रहो मुन्नाभाई' स्वतंत्रपणे ऑस्करसाठी पाठविणार!
लेखक Dinesh ्वेळ 6:41 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment