Friday, May 25, 2007

प्रेम करायचं राहुन गेलं

पाचवी पर्यंत प्रेम म्हणजे काय असतं ते माहीतच नव्हतं...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
दहावी पर्यंत अभ्यास,अभ्यास आणि अभ्यास...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता थोड तरी कळायला लागलं होत की प्रेम म्हणजे काय असतं,पण बारावी म्हणजे
आयुष्याच वळण...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
शाळेत असताना मुलीशी जास्त मैत्री कधी साधलीच नाही
त्यामुळे कॉलेज मध्ये सुध्दा मैत्री जपताच आली नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
आता मैत्रीनीही खुप आहेत, पण प्रपोज करायला डेअरींगच होत नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
प्रत्येक वेळा समोरच्यांच्या भावनांचा विचार केला, नाही म्हणाली तर
कदाचित चांगली मैत्रींन गमवून बसेन...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
कधी वाटत ह्या मुलींच्या मनातल सगळ कळाल असत तर बरं झाल असत ना!... पण ते
कधी कळालचं नाही...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
हल्ली पवईलेकवरच्या प्रेमीयुगुलांना पहातोना.. जीव खुप जळतो रे.. शपथ...
म्हणुन प्रेम करायचं राहुन गेलं.
नंतर विचार करतो अजुन लग्नाला दोन वर्षे आहेतं खुप वेळ आहे! अजुन वेळ
गेलेली नाही मित्रा.. काही तरी कर
पण काय करु कुणी मला प्रपोजच करत नाही

Tuesday, May 15, 2007

आशा

जेव्हा जेव्हा तुझ्या भेटीची आशा मी ठेवली,
तेव्हा तेव्हा पायात माझ्या, बेडी मी पाहिली..
खळकन ओघळले अश्रू गालावरी,
प्रत्येक अश्रूत तुझी प्रतिमा मी पाहिली..

अश्रूंस त्या अलगद मी उचलले,
प्रतिमेस त्या ओठांनी स्पर्शिले..
क्षणांत चेह-यावर हास्य विखुरले,
जरी मनात वेदनेचे बांध होते फुटले..

अशीच होणार का गं आपली भेट,
किना-यांची नजरानजर जशी होते थेट..
प्रेमाला या, नजर का लागावी जगाची,
पण,प्रेमिकांनीही हार कधी ना मानली..

तोडायला बेडी आता, ये तू अश्वावरी,
मी मेहंदीने, कडी बघ एक तोडली..
मंगल या सूत्रांत गुंफूनी प्रीत आपुली,
चालूया अग्निसाक्षीने मंदिरात सप्तपदी..

Tuesday, May 08, 2007

जाणीव

Saturday, May 05, 2007

महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक तापमान

राज्यातील उकाडा दिवसेंदिवस वाढत असून, आजही भुसावळला ४७, जळगावला ४६ अंश सेल्सिअस तापमान होते. हे राज्यातीलच नव्हे, तर देशातील सर्वाधिक तापमान आहे. ....
नाशिकला आज ४१.५ अंश सेल्सिअस तापमान झाल्याने उन्हाचे चटके आणखी वाढले. नागपूरलाही पारा ४२.५ वर गेला. राज्यातील विविध शहरांत आजही उच्चांकी तापमानाची नोंद झाली. उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक त्रस्त झाले असून, आणखी काही दिवस त्यातून सुटका होण्याची चिन्हे नाहीत.

राज्यातील प्रमुख शहरांचे आजचे तापमान असे ः नाशिक- ४१.५, धुळे- ४६, नंदुरबार-४६, नगर-४४, मालेगाव-४३, कुलाबा (मुंबई)- ३३.९, सांताक्रूझ (मुंबई)- ३३, नागपूर-४२.५, पुणे- ४१.९, महाबळेश्‍वर-३४.४, औरंगाबाद- ४२.४, सोलापूर- ४३ अंश सेल्सिअस.

देशातील प्रमुख महानगरांत तापमानात वाढ झाली आहे. अहमदाबाद- ४३.१, पणजी ३४.४, नवी दिल्ली- ३९.४, कोलकता- ३६, चेन्नई- ३६.२ असे तापमान होते. राज्यातील विविध शहरांत तापमान तीन ते साडेतीन अंश सेल्सिअसने वाढले आहे. नागरिकांना दुपारी घराबाहेर पडणे टाळून पंखे, वातानुकूलित यंत्रणांच्या आश्रयाला जावे लागत आहे. सक्तीच्या भारनियमनामुळे या समस्येत भर पडली आहे. पर्याय म्हणून अनेक नागरिक पर्यटनाला निघाले आहेत. रात्री उशिरापर्यंत या वातावरणाचा परिणाम जाणवत असल्याने नागरिकांच्या दिनचर्येवरही त्याचा परिणाम होत आहे. मुंबईत दमट हवामानामुळे नागरिकांना उन्हाचा तडाखा सुसह्य असला तरी त्यांना घामाने न्हाऊन निघावे लागत आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेशच्या काही भागांत तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. दक्षिण कोकण, गोवा, मराठवाड्याचा काही भाग आणि उत्तर मध्य महाराष्ट्राला त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे आणखी काही दिवस ही स्थिती कायम राहण्याची चिन्हे आहेत.

Google