राज्यातील उकाडा दिवसेंदिवस वाढत असून, आजही भुसावळला ४७, जळगावला ४६ अंश सेल्सिअस तापमान होते. हे राज्यातीलच नव्हे, तर देशातील सर्वाधिक तापमान आहे. ....
नाशिकला आज ४१.५ अंश सेल्सिअस तापमान झाल्याने उन्हाचे चटके आणखी वाढले. नागपूरलाही पारा ४२.५ वर गेला. राज्यातील विविध शहरांत आजही उच्चांकी तापमानाची नोंद झाली. उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक त्रस्त झाले असून, आणखी काही दिवस त्यातून सुटका होण्याची चिन्हे नाहीत.
राज्यातील प्रमुख शहरांचे आजचे तापमान असे ः नाशिक- ४१.५, धुळे- ४६, नंदुरबार-४६, नगर-४४, मालेगाव-४३, कुलाबा (मुंबई)- ३३.९, सांताक्रूझ (मुंबई)- ३३, नागपूर-४२.५, पुणे- ४१.९, महाबळेश्वर-३४.४, औरंगाबाद- ४२.४, सोलापूर- ४३ अंश सेल्सिअस.
देशातील प्रमुख महानगरांत तापमानात वाढ झाली आहे. अहमदाबाद- ४३.१, पणजी ३४.४, नवी दिल्ली- ३९.४, कोलकता- ३६, चेन्नई- ३६.२ असे तापमान होते. राज्यातील विविध शहरांत तापमान तीन ते साडेतीन अंश सेल्सिअसने वाढले आहे. नागरिकांना दुपारी घराबाहेर पडणे टाळून पंखे, वातानुकूलित यंत्रणांच्या आश्रयाला जावे लागत आहे. सक्तीच्या भारनियमनामुळे या समस्येत भर पडली आहे. पर्याय म्हणून अनेक नागरिक पर्यटनाला निघाले आहेत. रात्री उशिरापर्यंत या वातावरणाचा परिणाम जाणवत असल्याने नागरिकांच्या दिनचर्येवरही त्याचा परिणाम होत आहे. मुंबईत दमट हवामानामुळे नागरिकांना उन्हाचा तडाखा सुसह्य असला तरी त्यांना घामाने न्हाऊन निघावे लागत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पूर्वेकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र तसेच मध्य प्रदेशच्या काही भागांत तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. दक्षिण कोकण, गोवा, मराठवाड्याचा काही भाग आणि उत्तर मध्य महाराष्ट्राला त्याची सर्वाधिक झळ बसली आहे. कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे आणखी काही दिवस ही स्थिती कायम राहण्याची चिन्हे आहेत.
Saturday, May 05, 2007
महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक तापमान
लेखक
Dinesh
्वेळ
8:44 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)

1 ्जणांनी मते नोंदवली:
मी कोण ? आपल्या सारखाच एक.
Post a Comment