Saturday, January 14, 2006

मी महाराष्ट्राचा शत्रू

आज मी एक ब्लॉग पाहिला जो Save Maharashtra या शिर्षकाखाली वावरत आहे. या ब्लॉगमधील एक लेखाने मला स्वतःबद्दल विचार करायला लावले. लेखकाचे विचार मी इथे मांडत आहे.

Who are Enemies of Maharashtra?
Non Maharashrians who

Especially Marwadis who Lends money to Poor Marathi farmers on a whooping interest rates or on return to signiture on blank papers.They know that farmers will not able to return their loans , these thieves get the chance of grabbing their land .Marawadis and Gujarati community in Maharshtra are the main culprits of farmers sucides in Vidharbha and Marathwada region.


हे वाचल्यावर मी स्वतःबद्दल विचार केला. मी एक मारवाडी आहे. खरच असे काही होते का? मला असे वाटते की लेखक परिमल हा खूप जास्त चित्रपट जगात वावरत आहे व त्यालाच वास्तव समजून वागतोय. या सर्व गोष्टी केवळ चित्रपटांतच छान वाटतात. कदाचित परिमल एक गोष्ट जाणत नाही कि सध्या सर्व शेतकरी (मराठी अथवा बिगरमराठी) ग्रामिण बॅंकांतून अथवा पतपेढ्यांतून कर्ज घेतात. सावकारी पद्धत फार पूर्वी बंद झाली आहे.

जाता जाता मी एक सांगू इच्छितो की मी स्वतः मराठवाड्याचाच आहे. त्यामूळे मी हे खात्रीपूर्वक सांगू शकतो की मराठवाड्याबाबतचे लेखकाचे मत पूर्णत: चूक आहे.

या ब्लॉगला एका शिवसैनिकाने दिलेले उत्तर वाचनिय आहे.

6 comments:

Anonymous said...

barobar.he mhanaje vadyaache tel vangyaavar kaadhanyaasaarakha aahe.

Anonymous said...

मित्रा, मी स्वतः महाराष्ट्रावादी आहे. आज महाराष्ट्रात ३३% अन्यप्रांतीय (अमराठी) आहेत. आणि मराठीच्या आजच्या स्थितीला नाही म्हटलं तरी ही मंडळीसुद्धा जबाबदार आहेत. इथे तमिळनाडूतही भरपूर परप्रांतीय आहेत, पण सगळे सामाजिक जीवनात तामिळचाच वापर करतात. खाजगी आयुष्यात आपली मातृभाषाच बोलावी, पण तुमच्याकडून माझी किमान अपेक्षा एवढीच आहे की तुम्ही महाराष्ट्रीय सामाजिक जीवनात हिंदीऐवजी मराठी बोलावी. दिनेश, तू मराठी ब्लॉग सुरू करून एका नविन अध्यायाला सुरूवात केली आहेस. सर्व अन्यप्रांतीयांसमोर आदर्श ठेवला आहेस. महाराष्ट्र फक्त आमचा नाही, तो तुमचाही आहे.. जर तुम्ही मानला तर..
तुला खूप खूप शुभेच्छा!

Dinesh said...

धन्यवाद विहंग आणि अनिल.

अनिल, आम्ही नेहमीच महाराष्ट्राला आपली आई मानलॆ आहे व सदैव त्याच्या विकासासाठीच प्रयत्न केले आहेत.
या ठिकाणी मी एक गोष्ट सांगू इच्छितो की जर मारवाडी लोकांना तुम्ही हाकलायचे ठरवले तर राज्यातील ७०% पेक्शा जास्त उद्योग बंद पडतील..

Anonymous said...

राजा रे, तुझा भलताच गैरसमज झाला! तू महाराष्ट्राला स्वतःची भूमी मानतोस तर तुला उपरं ठरवणारे शिवसैनिक कोण वा मी कोण? उलट मराठी मातृभाषा असूनही मराठी बोलण्याची लाज वाटणाऱ्यांपेक्षा मला तू सच्चा मराठी वाटतोस. अर्थात, मारवाडी महाराष्ट्रातील ७०% उद्योग चालवतात, हे तुझं विधान अतिशयोक्त नाही वाटत का? बाय द वे, माझं नाव आशिष आहे. :)

Pranav Joshi said...

u should read my blog on this issue.
meemarathi.blogspot.com

Anonymous said...

आता मराठीत ल्हिवना सोप्पा आहे...ही साईट पहा www.quillpad.in/marathi हेच्यात तुम्ही मराठीत ल्हिव शकतया...हेच्यात ना तुम्ही ज़ार मराठी लिपीत ल्हिवल्या तर ते त्याला मरही लिपीत बदलते...वापरुन पहा तुम्ही..फार सोप्पा आहे...

Google