शिळोप्याच्या चार गोष्टी करणा-या दोस्ताची मी वाट पाहतोय !
तिचा सुवास घेऊन गुणगुणणा-या वा-याची मी वाट पाहतोय !
लोटला किती काळ त्याची मोजदाद केली नाही मी कधी
हिशोब क्षणाक्षणाचा आता लागण्याची मी वाट पाहतोय !
क्षणभरासाठीच् भिजवून गेली सर ती एक श्रावणाची
निसटलेल्या थेंबांचे मोती बनण्याची मी वाट पाहतोय !
कधी हटेल दूर ही गर्द ग्रहणाची छाया काळी
मुक्त होवून चांदणं बरसण्याची मी वाट पाहतोय !
उमटतील आपसुकच् सूर सर्व अंतरीचे
जरा मैफिल तुझी बहरण्याची मी वाट पाहतोय !
हृदयातून तुला साद दिली आहे मी कधीची
हृदयास तुझ्या ती भिडण्याची मी वाट पाहतोय!
Friday, April 28, 2006
मी वाट पाहतोय...
लेखक Dinesh ्वेळ 8:04 AM 0 ्जणांनी मते नोंदवली
Wednesday, April 12, 2006
शिवरायांच्या गडांना कॉपोर्रेट किल्लेदार?
शिवकालीन मुत्सद्दी रामचंद नीळकंठ अमात्य यांनी साडेतीनशे वर्षांपूवीर् दिलेला ' परम सावधपणे असतील त्या गडकिल्ल्यांची यथोक्त मजबुदी करावी ' या सल्ल्याची जपणूक करण्यासाठी सरकारला उशिरा का होईना जाग आली आहे. किल्ले आणि स्मारकांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी कॉपोर्रट क्षेत्राची कुमक मागवण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. मात्र , या निमित्ताने कॉपोर्ेरेट क्षेत्राच्या जाहिरातबाजीचे आक्रमण गड-किल्ल्यांवर होऊ नये , असा इशारा इतिहासाच्या अभ्यासकांनी दिला आहे.
राज्यातले ऐतिहासिक किल्ले तसेच स्मारकांच्या देखभालीसाठी कॉपोर्रेट कोऑपरेशन घेण्याचा मानस सांस्कृतिक खात्याचे मंत्री अशोक चव्हाण यांनी नुकताच विधिमंडळात बोलून दाखवला. इतिहासाचे अभ्यासक निनाद बेडेकर यांनी या कल्पनेचे स्वागत केलं. ते म्हणाले , ' कशी का होईना , किल्ल्यांची अवस्था सुधारत असेल तर चांगलंच आहे. आज हालचाली केल्या नाहीत , तर 60-70 वर्षांनी या किल्ल्यांच्या जागी फक्त डोंगरच राहतील. मात्र कॉपोर्रेट मदत घेताना किल्ल्यांवर डोळ्यांना खुपणारी जाहिरातबाजी होऊ देता कामा नये.
गिर्यारोहक हृषिकेश यादव यांनी देखील ही घोषणा स्वागतार्ह असल्याचा अभिप्राय दिला. किल्ले राखण्यासाठी अशी काही पावले उचलायलाच हवीत. मात्र , त्याचवेळी गडांचे पावित्र्य सांभाळले गेले पाहिजे. गडाच्या मूळ वास्तूची हानी होता कामा नये , असं यादव म्हणाले.
आज पुरातत्त्व विभागाकडे पुरेसा पैसा नाही. मग किल्ल्यांची वास्तपुस्त होणार कशी ? आता कॉपोर्रेट क्षेत्राच्या साह्याने ती होत असेल , तर काही हरकत नाही , असं गडभ्रमंतीचा मोठा अनुभव असलेले ' चक्रम हायकर्स ' चे माधव फडके म्हणाले. कॉपोर्रेट क्षेत्राचा मदतीचा हात प्रसिद्ध किल्ल्यांच्या मदतीसाठी पुढे येऊ शकतो पण त्याचबरोबर दुर्गम किल्ल्यांनाही त्याचा फायदा होईल , असे नियम करावेत , असं फडके यांनी सुचवलं.
गड-किल्ल्यांच्या वाटा धुंडाळणाऱ्या ' क्षितिज ग्रुप ' चे श्रीरंग वैद्य यांनी देखील किल्ल्यांचे पावित्र्य राखले जाणार असेल तर कॉपोर्रेट क्षेत्राची मदत घेण्यात काहीच हरकत नाही , असं मत नोंदवलं. रायगड जिल्ह्यात पालीजवळ सुधागड किल्ल्यासाठी सीमेन्स कंपनीनं असं काम केलं आहे , अशी माहिती त्यांनी दिली.
लेखक Dinesh ्वेळ 11:17 PM 2 ्जणांनी मते नोंदवली
Thursday, April 06, 2006
MIT NCC TROOP
या संस्थेबद्दलचे माझे विचार मी इथे एका कवितेमार्फत ठेवत आहे. ज्यांना या संस्थेबद्दल माहीत आहे त्यांना माझे विचार कळून येतील.
जस्सं च्या तस्सं राहील का सारं?
हाक नुसती ऐकून थांबेल का वारं?
TROOPमधील हे दिवस येतील का परत?
मिळतील का मला ही तीन वर्षे परत?
परेड च्या वेळी चढलेला जोश
होळीला केलेला जल्लोश
NCC show साठी रात्रभर जागणं
आणि हार्दीकच्या रूमवर जाऊन movie पाहणं
Trek साठी location शोधत राहणं
आणि location सापडल्यावर जल्लोशात नाचणं
Rotational साठी Donors शोधणं
आणि Emergency ला धाऊन जाणं
Main drive ला झालेली धावपळ
आणि wafers खाण्याची चंगळ
hall समोरची सुंदरसी रांगोळी
Blood donation ला येणारया WEC च्या पोरी
Trad day ला केलेली मजा
आणि अंकितचा द्रौपदी अवतार
हातात तलवार घेऊन
परिसचे म्हणणे खबरदार
अजयसोबत भांडण, अलोकसोबत संभाषण
आणि ते सर्व Group Discussions
Blood Donation चे पोस्टर्स
शंतनूचे attendance मस्टर
ट्रेकसाठी केलेली shopping
ट्रेकपूर्वी केलेली Packing
गड चडताना मिळालेली साथ
व अडखाळल्यावर समोर आलेले हात
canteen मध्ये जाऊन चहा टाकणं
CIPLA टाळण्यासाठी कारणं सांगणं
प्रत्येक B'day ला पार्टी घेणं
आणि सगळ्यांच placement celebrate करणं
छोट्याशा गोष्टीवर सारंगला रागावणं
आणि परत तोच येऊन sorry म्हणणं
मित्रांसोबत खूप खूप भांडणं
आणि परत त्यांच्याच खांद्यावर रडणं
मिळ्तील का मला हे मीत्र परत?
सापडेल का आयुष्याचं सूत्र परत?
खूप दिलं या troop ने मला
खरे मीत्र इथेच गवसले मला
आज मी जात आहे
troop पासून दूर
पण मी नेहमीच असेन
एका हाकेच्या अंतरावर
लेखक Dinesh ्वेळ 7:01 AM 2 ्जणांनी मते नोंदवली
आमच्या juniors कडून
्काही दिवसांपूर्वी आम्हाला MIT NCC TROOP मधून send off देन्यात आला.. त्यवेळी आमच्या juniors नी आम्हाला एक कविता अर्पण केली..
माझ्या भावना
प्रिय सीनियर्स,
बघता बघता वर्ष संपलं
कालचा नवा मी आज जुना झालो
तेव्हा फारसं काही कळत नव्हतं
सर, तुम्ही सांगुनही बरंचसं काही जमत नव्हतं
तरी तुमच्या मनात माझ्यासाठी कायम प्रेमच होतं
तुमची ती कणखर वाणी
त्याहून करडी नजर
वाटत नव्हती मला भीती
पण होता केवळ तो फक्त एक आदर
उद्या कदाचीत विस्तारेल तुमच्या माझ्यातलं अंतर
पण तरीही मनात कायम दरवळतील
तुमच्या स्म्रुती निरंतर...
--आपल्या जूनियर्स कडून
लेखक Dinesh ्वेळ 6:52 AM 0 ्जणांनी मते नोंदवली