शिळोप्याच्या चार गोष्टी करणा-या दोस्ताची मी वाट पाहतोय !
तिचा सुवास घेऊन गुणगुणणा-या वा-याची मी वाट पाहतोय !
लोटला किती काळ त्याची मोजदाद केली नाही मी कधी
हिशोब क्षणाक्षणाचा आता लागण्याची मी वाट पाहतोय !
क्षणभरासाठीच् भिजवून गेली सर ती एक श्रावणाची
निसटलेल्या थेंबांचे मोती बनण्याची मी वाट पाहतोय !
कधी हटेल दूर ही गर्द ग्रहणाची छाया काळी
मुक्त होवून चांदणं बरसण्याची मी वाट पाहतोय !
उमटतील आपसुकच् सूर सर्व अंतरीचे
जरा मैफिल तुझी बहरण्याची मी वाट पाहतोय !
हृदयातून तुला साद दिली आहे मी कधीची
हृदयास तुझ्या ती भिडण्याची मी वाट पाहतोय!
Friday, April 28, 2006
मी वाट पाहतोय...
लेखक Dinesh ्वेळ 8:04 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment