जमलंच नाही ..!
जमलंच नाही ..!
आपल्यालाही आवडलं असतं...
रोज संध्याकाळी तिला चौपाटीवर फिरवायला ,
तिच्या निळ्या डोळ्यांत स्वतःला हरवायला ,
वाळूत बंगला बांधता बांधता..
आलं असतं मनातलं सांगता..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!
आपल्यालाही आवडलं असतं..
कधीतरी तिच्यासोबत बागेमध्ये जायला ,
एकच कॅडबरी दोघांमधे वाटून खायला ,
कधी खोडी काढली असती..
आणखी गोडी वाढली असती..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!
आपल्यालाही आवडलं असतं...
तिचा हात हळुवारपणे आपल्या हातात घ्यायला ,
लता-रफ़ी, किशोर-आशा ड्युएट गाणं गायला ,
सूर कदाचित जुळले असते..
तिला मनातले कळले असते..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!
आपल्यालाही आवडलं असतं...
निघताच निघता तिला बावरलेलं पाहायला ,
मला तिची ,तिला माझी शपथ वाहायला ,
माझे अश्रू माझ्या डोळ्यांत लपले असते..
तिचे मात्र दवासारखे जपले असते..
पण जाऊ दे जमलंच नाही ..!
Sunday, September 17, 2006
जमलंच नाही
लेखक Dinesh ्वेळ 4:46 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
छान आहे कविता. आवडली.
u r '"KAVITA" is very good
Post a Comment