Sunday, August 13, 2006

पाणी

बरेच दिवस झाले मराठीत काही लिहीले नाही. काय लिहावे हे सुचतच नाही हल्ली. पूर्वी पावसाला पाहून मस्त कविता सूचत. हल्ली फक्त भीती वाटते.
मान्सून पावसाच्या आगमनाच्या वेळी मी खूप खूश होतो. मी माझ्या ब्लॉगवर देखील त्या बातम्या टाकत होतो. मॉन्सून आला, बरसला आणि बरसतच राहीला. परत जाण्याआधी तो एक भेट्वस्तू मात्र देऊन गेला. पाणी.. खूप पाणी.. सगळीकडे पाणी.. पाणीच पाणी.. फक्त पाणी.... घरात, दुकानांत, कारखान्यांत, रस्त्यात आणि डोळ्यांत..
बाकी सगळीकदचे पाणी तर निघून जाईल.. पण डोळ्यांचे काय? ते पाणी कोण शोषून घेणार?

No comments:

Google