महान कुस्तीगीर आणि निष्ठावान प्रशिक्षक हरिश्चंद्र बिराजदार यांना केंद्र सरकारचा ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारामुळे लातूर्च्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. यापुर्वी "काका पवार" या लातूर्च्या कुस्तीविरास अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.
या पुरस्कारामुळे आतापर्यंतच्या कामाचे चीज झाले असून, यानंतरही आणखी जोमाने मल्ल घडवेन, अशी प्रतिक्रिया श्री. बिराजदार यांनी व्यक्त केली....
""पोटाच्या दुखण्यामुळे मला कुस्ती अचानक थांबवावी लागली, तेव्हा निराश झालो होतो. मात्र प्रशिक्षण सुरू केल्यानंतर पुन्हा मन रमले. गोकुळ वस्ताद तालमीत मी गुरुकुल पद्धतीने मल्ल घडवितो आहे. या कामी तालमीचे अध्यक्ष शंकरराव आगाव, चिटणीस व्यंकटराव परसे, उपाध्यक्ष पंढरीनाथ पठारे अशा सर्वांचेच बहुमोल सहकार्य मिळत आहे,'' असे श्री. बिराजदार म्हणाले.
"रुस्तम-ए-हिंद' हरिश्चंद्र बिराजदार
- १९६९ मध्ये दादू चौगुले यांना हरवून "महाराष्ट्र केसरी' किताब, त्याच वर्षी कानपूरच्या स्पर्धेत "हिंदकेसरी' किताब.
- ७० च्या एडिंबरा (स्कॉटलंड) राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण.
- ७१ मध्ये नेत्रपालला हरवून "रुस्तम-ए-हिंद'चा बहुमान.
- ७७ मध्ये दिल्लीचा नामवंत मल्ल सतपालला बेळगावच्या मैदानात चितपट केले. हाच कारकिर्दीतील परमोच्च बिंदू.
- गोकुळ वस्ताद तालमीत गुरुकुल पद्धतीने मल्ल घडविण्याचे कार्य गेले एक तप सुरू. अर्जुन पुरस्कार विजेता काका पवार, गोविंद पवार, राजेश बारगुजे आदी अनेक नामवंत मल्लांना मार्गदर्शन.
Wednesday, August 23, 2006
कुस्तीतील "राजा हरिश्चंद्रा'ला जीवनगौरव
लेखक Dinesh ्वेळ 9:34 PM
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment