मागील काही दिवसांपासून मी वृत्तपत्रामधून दादासाहेब फाळके पारीतोषिकाबद्दलच्या बातम्या वाचतोय. त्यात प्रकर्षाने एक गोष्ट जाणवते. हे वृत्तपत्र कला क्षेत्रात राजनिती आणण्याचा प्रयत्न करतोय. उदा. "बंगाली नायिकेस पारीतोषिक मिळावे म्हणून सोमनाथ चॅटर्जी, प्रियरंजन दासमुन्शी, प्रनब मुखर्जी इ. नेते प्रयत्न्शील", "महाराष्ट्रातर्फ़े फक्त शरद पवार प्रयत्न करत आहेत" अशा प्रकारच्या बातम्या या वृत्तपत्रातून येत आहेत.
काय आपल्याकडे पारितोषिकांचा इतका खराब काळ आला आहे की आता हे राजकिय नेते पारितोषिकासाठी पात्र व्यक्ती ठरवणार? असेही राजकीय नेत्यांपेक्षा जास्त "नौटंकी" कोण करू शकतो?
७५ पेक्षा जास्त वर्षांची परंपरा असणारे हे वृत्तपत्र एकिकडे खेळात राजकारण आणल्याबद्दल नेत्यांवर टिका करतो आणि दुसरीकडे त्याच नेत्यांकडून अपेक्षा करतो की त्यांनी कलेच्या क्षेत्रात राजकारण आणावे. या दुटप्पीपणाच्या धोरणाला काय म्हणावे?
Friday, August 18, 2006
कलेचे राजनितीकरण
लेखक Dinesh ्वेळ 6:00 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment