म्हणुन मी हल्ली बोलतच नाही.....
मित्रांची नावे ई-मेल आय.डी. असतात,
भेटायच्या जागा चाट-रूम असतात,
कट्ट्यावर कोणी आता भेटतच नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही
दिसले कि हाय, जाताना बाय
पण समोर असताना प्रश्नचिन्ह, कि बोलायच काय,
अशी खोटी जवळीक मी कधी साधतच नाही,
मुखवट्याआड चेहरा कधी लपवत नाही
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही
आज इथे उद्या तिथे......... कोणासाठी कोणी थांबणार नाही
कोणीतरी साथ द्यावी हा माझा अट्टहास पण नाही,
पण इथुन तिथे जाताना कोणी निरोप तरी देइल कि नाही,
जाताना आपण, कोणी एक अश्रु तरी ढाळेल कि नाही,
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही
शब्दच हल्ली अर्थ विसरतात,
संवेदनाच हल्ली बधीर होतात,
भावनाच हल्ली बोथट होतात,
अगदी थोडी माणसचं हि कविता शेवटपर्यत वाचतात,
म्हणुन....................म्हणुन मी हल्ली बोलतच नाही
Saturday, August 19, 2006
म्हणुन मी हल्ली बोलतच नाही
लेखक Dinesh ्वेळ 5:31 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
घ्या आम्ही वाचली ही कविता अखेरपर्यंत..
आता बोलाल ना? ;)
कवी कोणी असो पण भावना मनातल्या आहेत.आमच्याही
Post a Comment