नुकत्याच झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर असे म्हटले गेले की बैंकांमधील गर्दी पाहता हल्ले होण्याची शक्यता जास्त आहे. मह्णून मी विचार केला की सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करावी.
सर्व्प्रथम मी "बैंक ऑफ ईंडिया" मध्ये गेलो आणि माझी बैग एका बाकड्यावर ठेवून हळूच एका रांगेत जाऊन उभा राहिलो. दोनच मिनिटांत सुरक्षारक्षक माझ्याकडे आला आणि बैग जवळ ठेवण्याबद्दल सांगितले.
नंतर मी SBI मध्ये गेलो. तीच पद्धत परत वापरण्याचा प्रयत्न केला. आणि लगेचच एका सामान्य माणसाने मला बैगबद्दल टोकले. नंतर कळाले की तो सामान्य माणूस एक पोलिस कॉन्स्टेबल होता सामान्य वेषात.
नंतर ICICI. ही बैंक तर अत्याधुनिक यात्रणा वापरण्यासाठी नेहमीच ओळखली जाते. मी बैग ठेवून वळाल्याबरोबर एक कर्मचारी मझ्याकडे आला आणि हळूच मला म्हणाला "सर, कैमेरा की नजर सब तरफ़ है".. बिचारा मी..
या सर्वानंतर आता माझी खात्री आहे की बैंकामध्ये मी सुरक्षीत आहे. मात्र मी अशी अपेक्षा करतो की तुम्ही पण अशा प्रयोगांमार्फ़त स्वतःच्या सुरक्षेची खात्री करून घ्या. अंतिमतः केवळ जनशक्तीच या विराष्ट्रीय तत्वांशी सर्वोत्तम प्रकारे लढू शकते.
जय हिंद..
Wednesday, October 11, 2006
सुरक्षेची पाहणी
लेखक Dinesh ्वेळ 10:26 AM
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment