Google च्या मते Gmail सर्वोत्तम नाही आहे आणि म्हणूनच Gmail चा Pagerank ९/१० आहे, जो १०/१० असायला हवा.
Pagerank बद्दल माहिती या ठिकाणी आहे.
Tuesday, February 28, 2006
Gmail सर्वोत्तम नाही
लेखक Dinesh ्वेळ 9:20 PM 0 ्जणांनी मते नोंदवली
Sunday, February 26, 2006
तोंडात पाणी
परवा रक्तदान शिबीराच्या वेळी केलेली ही सजावट पाहून नक्की तुमच्या तोंडात पाणी येईल..
लेखक Dinesh ्वेळ 8:02 PM 0 ्जणांनी मते नोंदवली
Saturday, February 25, 2006
Monday, February 20, 2006
रक्तदान: जीवनदान
MIT NCC TROOP ही संस्था २२ फ़ेब्रुवारी, २००६ बुधवार रोजी संत ज्नानेश्वर हॉल, MIT, पुणे या ठिकाणी एका रक्तदान शिबिराचे आयोजन करीत आहे. क्रुपया, आपल्या वेळापत्रकातील २० मिनीटे एका माणसाचे प्राण वाचवण्यासाठी वापरा.
अपेक्षा आहे की एका सहभारतीयाशी "रक्ताचे नाते" जोडण्यासाठी आपण सर्व जण पुढाकार घ्याल.
धन्यवाद
लेखक Dinesh ्वेळ 11:25 AM 1 ्जणांनी मते नोंदवली
Sunday, February 19, 2006
सजा
मिली है बहोत सजा
उनसे दिल लगाने की
नजर लग गयी
हमारे प्यारको जमानेकी
कबर से निकले हुये
दोनो हाथ कहते है
आरजू रह गयी
उन्हे गले लगानेकी
लेखक Dinesh ्वेळ 10:07 AM 2 ्जणांनी मते नोंदवली
Friday, February 17, 2006
माझी विविध रूपे
मी काही कोणी अष्ट्पैलू व्यक्ती किंवा एखादा देखना नट वगैरे नाही आहे. केवळ आपल्याला माझी काही छायाचित्रे दाखवण्यासाठी ही उठाठेव. मला ठाऊक आहे या post ला लोड होण्यासाठी खूप वेळ लागेल व त्याबद्दल मी हार्दिक क्षमस्व आहे.
तोपर्यंत लातूर ब्लॉग अथवा माझा मूळ ब्लॉग पाहायला काय हरकत आहे? या लिंकवर click केल्यास नविन window open होईल. त्यामूळे आपण बिन्धास्त click करू शकता.
पिरॅमिड मेगास्टोर, SB रोड चे उद्घाटन प्रसंगी
होय मीच
माझे घर
माझी आवडती भेळ
ंमाझी FE रूम
Laptopसहीत
अभ्यास (अति दुर्मीळ छायाचित्र)
NCC Web siteसाठी काम करताना
माझी नकारात्मक (Negative) बाजू:)
हरीद्वार येथे लखनवी पोषाखात
NCC show 2005 साठीचा पोषाख बनवताना
लांब केस
Traditional Day 2005
Traditional Day 2006
आशिष सोबत एक जूना फ़ोटो
सह्याद्रीसोबत असताना मला कोणत्याही बिछान्याची गरज नाही
तिकोना किल्ला साफ़ करताना
ंगडप्रेमी मी
भटक्या मी
लेखक Dinesh ्वेळ 7:49 AM 0 ्जणांनी मते नोंदवली
Thursday, February 16, 2006
रोपट्याची व्यथा
कोमल रोपटं पाहत होतं वाट
एका मोत्याच्या थेंबाची...
तो होऊन आला दवबिंदू
पात्यावर ओघळण्यासाठी...
स्वतःच तेज घेऊन गेला
आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी...
कोमल रोपट्याला हवा होता आधार
ताठ उभे राहण्यासाठी...
तो होऊन आला तुफान
बेफ़ाम वागण्यासाठी...
आपल्याच पायी तुडवून गेला
शक्तीप्रदर्शन करण्यासाठी...
कोमल रोपट्याला आस होती
एका रिमझीम सरीची...
तोही आला आपल्याच ऋतूत
मुसळधार बरसण्यासाठी...
पाणीच पाणी करून गेला
आयुष्यभर गटकळण्यासाठी...
लेखक Dinesh ्वेळ 7:37 PM 1 ्जणांनी मते नोंदवली
Tuesday, February 14, 2006
स्त्री जातीला प्रणाम
होय.. आज मी स्त्रीजातीला शतशः प्रणाम करतो. व हे मी पूर्ण शुद्धीत बोलत आहे. याला कारणही तसेच आहे. मी माझ्या मूळ ब्लॉग मध्ये लिहीलेला हा लेख वाचल्यास तुम्हालाही हे पटेल.
लेखक Dinesh ्वेळ 6:36 AM 2 ्जणांनी मते नोंदवली
Thursday, February 09, 2006
मुझे अच्छा लगता है
मुझे अच्छा लगता है
यूं ही अश्कोंको
पी पी कर जीना
मुझे अच्छा लगता है
हिल जाता है दिल
उसकी किसी पुरानी बात पे
उस बातको दोहराकर
उसकी यादों मे खो जाना
मुझे अच्छा लगता है
देने वाले ने दिये जख्म
इन ज्ख्मोंसे दोस्त की
तरह पेश आना
मुझे अच्छा लगता है
लेखक Dinesh ्वेळ 4:45 AM 0 ्जणांनी मते नोंदवली
Tuesday, February 07, 2006
ओमकारेश्वर मंदीर
३ फ़ेब्रुवारी रोजी मी आणि धीरज ओमकारेश्वर मंदीरात गेलो होतो. हे मंदीर सदाशिवराव भाऊंच्या कालखंडात बांधले गेले. हे मंदीर त्याच्या दगडी बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. हे बांधकाम १९६२ सालच्या पानशेतच्या पूरामध्येदेखील सुरक्शित राहिले. या मंदिरातच चिमाजीअप्पांची समाधी आहे. याच ठीकाणी त्यांच्या पत्नी १७३७ साली सती गेल्या होत्या.
लेखक Dinesh ्वेळ 9:30 PM 1 ्जणांनी मते नोंदवली
Monday, February 06, 2006
आठवण
मनामनातून उसळलेली अनामीक हूरहूर
याच वळनावर भरून आलाय आज माझाही ऊर
तूझी आठवण कधीच सोडून जाणार नाही दूर
लेखक Dinesh ्वेळ 10:07 AM 1 ्जणांनी मते नोंदवली
Wednesday, February 01, 2006
पैसा
त्याच्यासाठीच भर दरबारात
द्रोपदीचं वस्त्र फाडलं गेलं
फक्त त्याच्यासाठीच
राजा हरीश्चंद्राला
स्वप्न पाडलं गेलं...
अन् वेळोवेळी
पैसाच नसतो सर्व काही
असं म्हणताना
वास्तवाला मातीत गाडलं गेलं...
आजही त्याच्यासाठीच जो तो वेडावला आहे
पैशासाठी माय बहिणी
गहाण टाकणारा 'माणूस'
या कलयुगानं घडवला आहे..
माणसामध्ये असणारा
माणुसकीचा अंश
माणसाने आज
काढून फेकला आहे...
न्यायदानासाठी न्यायखुर्चीवर
बसवलेला न्यायाधिशही
पैशाने आज विकत घेतला आहे.
लेखक Dinesh ्वेळ 7:42 PM 1 ्जणांनी मते नोंदवली