Thursday, February 16, 2006

रोपट्याची व्यथा

एक क्षण जगण्यासाठी
कोमल रोपटं पाहत होतं वाट
एका मोत्याच्या थेंबाची...
तो होऊन आला दवबिंदू
पात्यावर ओघळण्यासाठी...
स्वतःच तेज घेऊन गेला
आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी...

कोमल रोपट्याला हवा होता आधार
ताठ उभे राहण्यासाठी...
तो होऊन आला तुफान
बेफ़ाम वागण्यासाठी...
आपल्याच पायी तुडवून गेला
शक्तीप्रदर्शन करण्यासाठी...

कोमल रोपट्याला आस होती
एका रिमझीम सरीची...
तोही आला आपल्याच ऋतूत
मुसळधार बरसण्यासाठी...
पाणीच पाणी करून गेला
आयुष्यभर गटकळण्यासाठी...

1 comment:

Jupiter said...

सही रे, फ़ारच छान !

Google